Welcome to Yodha News   Click to listen highlighted text! Welcome to Yodha News
महाराष्ट्र

‘२.० व्हिजन’ साकारण्यासाठी संगमनेर नगरसेवकांचा मुंबई महापालिकेला अभ्यास दौरा

आमदार सत्यजित तांबे व नगराध्यक्ष मैथिलीताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवकांचा अभ्यास दौरा

 

संगमनेर 

दि. २२ फेब्रुवारी २०२६

 

संगमनेर नगरपालिकेच्या विकासाला नवे परिमाण देण्यासाठी आणि ‘२.० व्हिजन’ची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने संगमनेर नगरपालिकेचे नवनिर्वाचित सत्ताधारी नगरसेवक आज सकाळी मुंबई अभ्यास दौऱ्यासाठी रवाना झाले.

 

हा दौरा मुंबई महानगरपालिका यांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करण्यासाठी आयोजित करण्यात आला असून, आधुनिक प्रशासन, पारदर्शक कारभार, नागरी सुविधा व्यवस्थापन व स्मार्ट सिटी संकल्पनांचा प्रत्यक्ष अनुभव घेणे हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश असावा.

 

या दौऱ्यासाठी चार इनोव्हा गाड्या व दोन मोठ्या वाहनांद्वारे नगरसेवक मुंबईकडे रवाना झाले. तीन ज्येष्ठ व अनुभवी नगरसेवक संगमनेरमध्ये थांबले असून, उर्वरित सर्व नगरसेवक या अभ्यास दौऱ्यात सहभागी झाले आहेत.

 

हा दौरा आमदार सत्यजित तांबे व नगराध्यक्ष मैथलीताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली पार पडत असून, शहराच्या विकासासाठी नव्या संकल्पना आत्मसात करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.

 

मुंबई महानगरपालिकेतील घनकचरा व्यवस्थापन, वाहतूक नियंत्रण, डिजिटल सेवा, पाणीपुरवठा व्यवस्था, अतिक्रमण नियंत्रण, ई-गव्हर्नन्स प्रणाली, नागरी आरोग्य सेवा आणि तक्रार निवारण यंत्रणा यांचा सखोल अभ्यास या दौऱ्यात करण्यात येणार असे दिसत आहे.

 

या दौऱ्यादरम्यान नगरसेवकांना वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळणार असून, यशस्वी प्रकल्पांची प्रत्यक्ष माहिती घेतली जाणार आहे. मिळालेल्या अनुभवाच्या आधारे संगमनेर शहरात अधिक सक्षम, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख प्रशासन राबविण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे.

 

“संगमनेरच्या विकासासाठी केवळ योजना नव्हे, तर आधुनिक विचारसरणी आणि प्रभावी अंमलबजावणी आवश्यक आहे. मुंबई महापालिकेच्या कार्यपद्धतीतून प्रेरणा घेऊन शहराचा कायापालट करण्याचा हा प्रयत्न असावा.” नगरसेवकांमध्ये ‘२.० मानसिकता’ निर्माण करून विकासाचा वेग वाढवणे हा या दौऱ्याचा मुख्य हेतू असावा.

 

दरम्यान, या अभ्यास दौऱ्यामुळे संगमनेरच्या पायाभूत सुविधा, स्वच्छता, वाहतूक, पर्यावरण आणि नागरी सेवांमध्ये सकारात्मक बदल अपेक्षित असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. ‘२.० व्हिजन’च्या दिशेने टाकलेले हे पाऊल शहराच्या भविष्यासाठी महत्त्वाचे ठरणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.


 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!