आर. सी. शाह यांची एस.आर.ए. मुंबईच्या समन्वयक अधिकारी (लेखापरीक्षण) पदी निवड
सहकार क्षेत्रातील अनुभवी नेतृत्वाला राज्य शासनाकडून महत्त्वाची जबाबदारी
संगमनेर :
संगमनेरचे सुपुत्र, सहकार क्षेत्रातील जाणकार व सर्वांचे मित्र म्हणून ओळखले जाणारे आर. सी. शाह यांची महाराष्ट्र शासनाच्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, मुंबई (SRA, Mumbai) येथे “समन्वयक अधिकारी (लेखापरीक्षण)” या महत्त्वपूर्ण पदावर निवड होऊन त्यांनी नुकतेच पदभार स्वीकारला आहे.
आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी सर्वोदय नागरी पतसंस्थेचे व्यवस्थापक (मॅनेजर) म्हणून काम पाहिले. त्यानंतर महाराष्ट्रातील नव्या नेतृत्वाखाली सर्वोदय बँकेचा कार्यभार प्रभावीपणे सांभाळत बँकेच्या प्रगतीत मोलाचे योगदान दिले. संगमनेरच्या सहकार क्षेत्राच्या जडणघडणीत त्यांचा मोठा वाटा आहे.
यानंतर त्यांनी शासन व सहकार क्षेत्रातील विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या. सहकार चळवळीचे अभ्यासक, जाणकार व प्रवक्ते म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या अनुभवाचा लाभ अनेक संस्थांना झाला आहे.
राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ते निकटवर्तीय मित्र म्हणून ओळखले जातात.
आर. सी. शाह यांच्या या निवडीबद्दल संगमनेर शहर व तालुक्यातील नागरिक, सहकारी संस्था, मित्रपरिवार व शुभेच्छुकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या नव्या जबाबदारीतून राज्याच्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांना अधिक गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.



