कला क्षेत्रातील योगदानाला पद्मश्री; योद्धा न्यूजचे कार्यकारी संपादक संजय क्षत्रिय यांनी घेतली रघुवीर खेडकर यांची विशेष मुलाखत
संगमनेर
संगमनेर तालुक्यातील ज्येष्ठ कलावंत श्री. रघुवीर तुकाराम खेडकर यांना कला क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. भारत सरकारकडून अधिकृत पत्राद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.
या ऐतिहासिक यशानंतर योद्धा न्यूजचे कार्यकारी संपादक संजय क्षत्रिय यांनी श्री. खेडकर यांची विशेष मुलाखत घेतली. या मुलाखतीत खेडकर यांनी आपल्या कला प्रवासाचा संघर्ष, साधना, समाजाशी असलेली नाळ आणि पद्मश्री मिळाल्यानंतरची भावना मनमोकळेपणाने व्यक्त केली.
संजय क्षत्रिय यांनी मुलाखतीदरम्यान सांगितले की, “रघुवीर खेडकर यांचा सन्मान हा केवळ व्यक्तीचा नाही, तर ग्रामीण कला आणि परंपरेचा राष्ट्रपातळीवर झालेला गौरव आहे.”
या मुलाखतीला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून, संगमनेरसह संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यातून श्री. खेडकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.





