अभियंता योगेश धापटकर यांचा वाढदिवस विविध उपक्रमांसह उत्साहात साजरा
शिवजयंतीनिमित्त शिवरायांना अभिवादन; मित्रपरिवारासोबत स्नेहभोजनाचा कार्यक्रम

संगमनेर
दि. १९ फेब्रुवारी २०२६
संगमनेर येथील अभियंता व कॉन्ट्रॅक्टर योगेश धापटकर यांचा वाढदिवस आज विविध उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला.

वाढदिवसानिमित्त त्यांनी शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर बस स्थानक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर आहेर कट्टा येथे मित्रमंडळींच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. पुढे कृष्णा गार्डन येथे स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने मित्र, हितचिंतक व नागरिक उपस्थित होते.

योगेश धापटकर यांनी संगमनेर बस स्थानक ते अमृतवाहिनी महाविद्यालय दरम्यानच्या महामार्ग प्रकल्पात पर्यवेक्षक म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. या प्रकल्पाच्या कामामध्ये गुणवत्ता, टिकाऊपणा व सौंदर्य यांना विशेष प्राधान्य देण्यात आले.
कामाच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड न करता आवश्यक त्या सुधारणा वेळोवेळी करून घेण्यात त्यांनी विशेष लक्ष दिले. तसेच रस्त्याच्या दुभाजकातील वृक्षलागवडीसाठी योग्य माती, खत व नियोजनावर भर देण्यात आला असून, त्यामध्येही त्यांचे योगदान उल्लेखनीय ठरले आहे.
प्रामाणिक कार्यशैली, जबाबदारीची जाणीव व सामाजिक बांधिलकी यामुळे योगेश धापटकर यांना नागरिकांमध्ये विश्वासाचे स्थान प्राप्त झाले आहे. त्यांच्या कार्याची विविध स्तरांतून प्रशंसा करण्यात येत आहे.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त मित्रपरिवार, हितचिंतक व संगमनेरवासीयांकडून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या असून, पुढील कार्यासाठी यश मिळावे, अशी सदिच्छा व्यक्त करण्यात आली आहे.





